Friday, July 30, 2010

तिचं ते खोटं बोलणं
बोलताना दूसरी कडेच पाहणं
मधेच खाली पाहून लाजणं
लाजताना
मग पुन्हा हसणं
आवडू लागलं आहे मला ते सर्व...
.
तिच्या खोटं
बोलण्यातून ती
माझा आनंद शोधत असावी
नाहीतर बोलणं तिचं खोटं
कसं
आवडलं असतं मला...?
.
तिचा स्वार्थ कधी नव्हताच
आणि माझे नुकसानही
नव्हते यात
तिच्या प्रेमात पडताना मला
तिचं खोटेपणच आवडलं होतं फार
.
खोटं
बोलणं जर,
एक भाग असेल प्रेमाचा...
तर खुप आवडेल मला
तिचं खोटं
आयुष्यभर ऐकायला...

No comments:

Post a Comment